साईधाम प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा

बारामती: सोमवार दिनांक 8 मार्च 2021 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे साईधाम प्रतिष्ठान बारामती व के के आय बुद्रानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत पवारवाडी यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया  तसेच अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती सदस्य व माजी सभापती करण भैया घोलप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले 
     यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत करे उपसरपंच बबनराव वाबळे ग्रामसेवक आटोळे मॅडम व गावातील  ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्षा सौ संगीता घाडगे यांनी महिला दिनानिमित्त संस्थेच्या वतीने डोळे तपासणी व मोतीबिंदू उपचारा बदद्ल शिबी रात माहिती दिली व संस्थेचे सचिव सूर्यकांत नागनाथ घाडगे यांनी प्रास्ताविक केले ग्रामस्थांनी या शिबिराचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतला या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सहसचिव ज्ञानेश घाडगे यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!