महाराष्ट्रातील विविध भागात पंजाब प्रांतातील हार्वेस्टर दाखल.
आसू – फलटण पूर्वभागातील आसू तसेच आसू परिसरामध्ये गतवर्षी पेक्षा चालू वर्षी गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले असून या घेतलेल्या गहू पिकाची काढणी ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून करण्यास सुरुवात होते. याच गहू पिकाची काढणी व कापणी करण्यासाठी पंजाब प्रांतातील हार्वेस्टर फलटण पूर्व भागात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गहू पिकाची पेरणी साधारणपणे नोव्हेंबर महिन्या पासून केली जाते ती डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते. गहू पिकाची आंतरमशागत करून गहू पीक हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून मार्च महिन्या पर्यंत कापणी व काढणी केली जाते.याच गहू पिकाची कापणी व मळणी करण्यासाठी पंजाब प्रांतातील लोक फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्यवसायासाठी फलटण तालुक्यात तसेच फलटण पूर्व भागात दाखल झाले आहेत व महाराष्ट्रातील विविध भागात दाखल होतात.
पूर्वी अल्प प्रमाणात बागायती शेती होती त्यामुळे शेती कामासाठी मजूर वर्ग सहज उपलब्ध होत होता. त्यावेळी मजुरांच्या साह्याने गहू पिकाची कापणी करून मळणी केली जात असे परंतु आता आधुनिक शेती तंत्राचा उपयोग करून बागायती भागात मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. यामुळे मजूर वर्गाचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे व त्याच बरोबर मजुरांच्या साह्याने शेतात उत्पादन घेयचे झाल्यास मोठ्या प्रमाणात वेळ व उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे शेतकरी वळला आहे त्याच बरोबर आधुनिक शेती करत असताना आधुनिक पद्धतीच्या शेती सामुग्रीचा उपयोग करून कमी वेळेत आणि कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन घेऊन अधिक नफा कशा पद्धतीने घेता येईल याकडे मोठ्याप्रमाणात शेतकरी लक्ष केंद्रीत करत आहे. याच बरोबर गहू काढणीसाठी मजुरांचा उपयोग केला बराच कालावधी लागतो व उत्पादन खर्च ही जास्तप्रमाणात करावा लागतो परंतु त्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असता म्हणजेच गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा उपयोग केला असता कमी वेळेत व कमी उत्पादन खर्चात गहू काडून मळणी करू होतो या मध्ये उत्पादन खर्चात व वेळेत खूप बचत होते यामुळेच गहू काढणीसाठी शेतकरी हार्वेस्टला अधिक पसंती देत आहेत.
– हार्वेस्टरच्या साह्याने गहू काढला असता अगदी काही तासातच शेतातील सर्व गहू काडून होतो. गहू काढणी यंत्र हे पंजाब राज्यातुन आपल्या राज्यामध्ये व्यवसायासाठी येतात व लाखो रुपये घेऊन जातात तसेच आपल्या येथील लोकांनी सुद्धा हार्वेस्टिंगच्या व्यवसायात पुढाकार घ्यावा .– पोपटदादा गावडेशेतकरी,खटकेवस्ती