सातारा दि.7 (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. दि. 1 मार्च 2021 पासून संपुर्ण देशात, राज्यात व सातारा जिल्ह्यातही 60 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना व 45 ते 59 वर्ष वयोगटातील कोमोर्बीड आजार ( हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार इ. ) व्याक्तिंना कोविड-19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील या वयोगटातील लाभार्थींना कोविड लसीकरणाचा लाभ मिळण्याकरिता नागरिकांनी https://seilfregistration.
दि. 8 मार्च 2021 पासून सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये व 65 प्राथमिक आरोग्य केंद्र 79 शासकीय व 10 खाजगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या मध्ये जिल्हा रुग्णालय, सातारा उप जिल्हा रुग्णालय कराड व फलटण. ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगांव, ढेबेवाडी, पाटण, मिशन हॉस्पीटल वाई, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रा.आ. केंद्र (ठोसेघर ता.सातारा, येवती ता.कराड, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनवडे ता.पाटण ही ठिकाणे वगळून ) व नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तुरबा ता. सातारा व कराड या शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत खाजगी आरोग्य संस्थामध्ये ॲन्को लाईफ सेंटर तामजाईनगर सातारा, संजीवन हॉस्पीटल सातारा, कृष्णा हॉस्पीटल कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा हॉस्पीटल कराड, गुजर मेमोरियल हॉस्पीटल कराड, मानसी मेमोरियल हॉस्पीटल खंडाळा, पाटील हॉस्पीटल कोरेगाव, मंगलमुर्ती क्लिनिक सातारा, घेाटवडेकर मेमोरियल हॉस्पीटल वाई, या ठिकाणी रुपये 250 प्रती डोस प्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे.
वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिकांना व 45 ते 59 वर्ष वयोगटातील कोमोर्बीड आजार ( हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार इ. ) व्याक्तिंना कोविड-19 चे मोफत लसीकरण करुन घेणे बाबत. डॉ.अनिरुध्द आठल्ये,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद सातारा यांनी आवाहन केले आहे.