जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
जळोची येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान परिसरातील पेवर ब्लॉक कामाचा उद्घाटन समारंभ रविवार 7 मार्च रोजी बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यमान नगरसेवक अतुल बालगुडे, पंचायत समितीचे माझी गटनेते दीपक मलगुंडे, बारामती दूध उत्पादक संघाचे माजी व्हाईस चेअरमन प्रताप पागळे, बारामती नगर परिषदेचे माजी नगरसेवक शैलेश बगाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ढवाण, माजी सरपंच दत्तात्रय माने, उत्तम धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा देवस्थान समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराच्या सभामंडपाचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमांमध्ये अतुल बालगुडे, प्रताप पागळे, दिपक मलगुंडे आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीरंग जमदाडे, हरिश्चंद्र जमदाडे, दादासाहेब दांगडे, नारायण दादा जमदाडे, विजय जमदाडे, विजय फरांदे, अनिल जमदाडे, नवनाथ जमदाडे, संतोष जमदाडे, निखिल होले, किरण फरांदे, बाळासाहेब बनकर आदींनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक मनोहर जमदाडे यांनी केले. धनंजय जमदाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.