फलटण :
जागतिक महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लायनेस क्लब फलटण व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांच्याकडून विविध व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यासाठी सुप्रसिद्ध वक्ते सौ.दुर्गा गोरे यांचे आजच्या स्त्री पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे तसेच श्रीमती भावना शहा यांचे महिलांचे स्वास्थ व योग या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त या व्याख्यानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्षा नीलम लोंढे- पाटील यांनी केले आहे सदर कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथी ला.वैभवी बुडूख प्रांताध्यक्षा लायनेस असणार आहेत व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनुपमा दाभाडे प्राथमिक शिक्षिका जि. प .शाळा मेढा या करणार आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी त्याचप्रमाणे आजच्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांच्या समोर असणाऱ्या अडचणी हे अत्यंत जिव्हाळ्याच्या विषया संदर्भात अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रम रविवार. 7 मार्च 2021 रोजी सायं.6ते7 या वेळेत झूम ॲपवर ऑनलाइन कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाची लिंक रविवारी प्रसिद्ध केली जाईल.