आजची स्री ही
शिकलेली आणि कष्टकरी
प्रत्येक क्षेत्रात पुढे
कला, क्रीडा असो वा नोकरी.
स्री म्हणजे काय? साडी किंवा पंजाबी ड्रेस घातलेली, लांब केसांची, उंच, हातात बांगडया, पायात पैंजण आणि जोडवी, कानात रिंग, नाकात चमकी….
एकविसाव्या शतकात स्री ने स्वतःची शक्ती, ताकद ओळखली अधिकारांसाठी झगडली.
“बंदिवान मी या जन्माची
नारी बनूनी जन्म भूवरी !”
स्री म्हटलं की चूल आणि मूल हे दृश्य डोळ्यांपुढे उभं राहतं.”जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उध्दारी!”. स्री सुशिक्षित असो वा नसो, शहरी आसो वा ग्रामीण, तिच्यात प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती असते. जगात सगळं काॕपी करु शकतो पण तिच्यातील कलेला कोणीच काॕपी करु शकत नाही.
“या देवी सर्व भुतेषु रुपेण संस्थिता!
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!!”
“स्री ची बुद्धीमता ही निसर्गातच असते.” असं कालिदासाने म्हटलं आहे. पण बायकांना काय कळतं ? असं म्हणणारे महाशहाणे आजही या जगात आहेत. पुरुषांच्या बरोबरीने स्थान घेणारी स्री चे उदाहरण देताना तिला जन्मापासून मरेपर्यंत संघर्ष करावा लागतोय. दुसऱ्यांची आवड निवड जपेपर्यंत तिच्या आवडी निवडीचा ‘ऊँ भट स्वाहा!’ असं होत. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाला अन्न पुरवठा करणारी नाळ कापली जाते. , परंतु स्री जेव्हा जन्म घेते तेव्हा तिची नाळ या समाजाशी बांधली जाते.
“शास्त्रज्ञ , डाॕक्टर बनलीस तू,
राष्ट्रपती, पंतप्रधान भूषविले.”
सोङिले न एकही क्षेत्र, अंतराळही पार केलेस तू.
आजचं जिवंत उदाहरण घेतलं तर एक महिला डाॕक्टर घरात आई, बहिण, बायको अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत आहे. बाहेर समाजाची सेवा करत आहे. ती सेवा करत असताना तिला तिच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही आणि घरात सुध्दा मुक्तपणे वावरता येत नाहीये.कौशल्यासारखी माता एकीकडे व स्वतःचे हित बघणारी कैकयी आणि एकीकडे जिजाबाई. जिने आदिमायेच्या साथीने आपल्या मुलाला शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याची प्रेरणा दिली.
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
“यत्र नार्यस्तु पुज्यते, रमन्ते तत्र देवता” याचा अर्थ असा आहे की- जिथे स्रियांना आदर दिला जातो , पुजले जाते, तिथे देवाचे स्थान असते. मला असं म्हणायचं नाही की, त्या स्री चे रोज पाय धुवून पाणी प्या. पण जरा चार माणसात इज्जत ठेवा. बोलताना संयम बाळगा. रागावर आवर घाला. आपल्या मनातील गैरसमज झाडून स्वातंत्र्याचा उपयोग करा. त्यासाठी “उठा, जागे व्हा, हीच योग्य वेळ आहे.
“तूच या विश्वासाची वसुंधरा !
तूच सखी नि तूच दामिनी !
तू इंदिरा तू झाशी !
तू जिजाऊ तू सावित्री !
तू प्रतिमा तू कल्पना !
तूच आहे यशाची खात्री !
काल काय नि आज काय नि उद्या काय ? तू फक्त नाव उज्वल कर. तुझ्याशिवाय या जगाचा उध्दार होऊ शकत नाही. शेवटी म्हणावे वाटते की, प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्री असते.
राखी धायगुडे देवकाते