गोखळी( प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील संपतराव मारुतराव भोसले वय( ८०) यांचे बुधवार दिनांक 3 रोजी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. तर यांचे चिरंजीव पोपटराव संपतराव भोसले (६१) यांचे पुणे येथे दवाखान्यांमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पिता पुत्रांचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण राजाळे गावावर दुःखाचे सावट पसरले होते. या दुखःद निधनाचे वृत्त समजताच राजाळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. संपतराव भोसले ( नाना) यांचे पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, असा परिवार आहे.त्याना नाना या त्यांनी राजाळे गावचे उपसरपंच पद भूषवले होते. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता. स्वर्गीय हनुमंतराव पवार यांचे कट्टर समर्थक होते.ते माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचे चुलते होत. तर त्यांचे पुत्र पोपटराव भोसले यांचे पश्चात पत्नी ,एक, मुलगा एक मुलगी, एक बहीण व तीन भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांनी फलटण येथील श्रीराम निरा व्हॅली डिसलरी चे मॅनेजर पद काही काळ सांभाळले होते. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचे चुलत बंधू होत.