फलटण दि.२ :
महिला सबलीकरण , महिला सशस्तीकरण ,महिलाना स्वावलंबन बनवणे त्यानां प्रेरणा देणे या सारख्या सामाजिक कार्या साठि यंदा चा महिला दिन संपूर्ण आठवडा भर साजरा करण्यात येईल. यातील पहिल्या दिवशी च्या कार्यक्रमात सौ.निबाळकर बोलत होत्या. या वेळी फलटण ऐज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्नर कौन्सिल सदस्या मा.सौ.वसुंधराराजे नाईक निंबाळकर उपस्थित होत्या.
महिलांनी स्वतः च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच औचित्य साधून आज मालोजीराजे महाविद्यालयात विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा सर्टिफिकेट व ट्राफि च वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या वतीने महाविद्यालयातील मुलीसाठी सँनटरी पँड डिस्पोजल मशीन भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात फलटण लायन्स क्लब गोल्डन च्या सदस्या सौ.देशमुख मँडम , सौ सुनंदा भोसले मँडम, सौ.सुनीता कदम मँडम, प्रशालेचे प्राचार्य श्री. कोळेकर सर ,उपप्राचार्य श्री. वेदपाठक सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.काशिद मँडम यांनी केले प्रस्तावना सौ.काकडे मँडम केली. तर आभार सौ.निंबाळकर .बी .आर मानले