जळोची:
फलटण जि.सातारा येथे ॲग्रोन्युज परिवार फलटण यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त धर्मवीर छञपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनात बारामती विद्या प्रतिष्ठान येथील प्राध्यापक लेखक लक्ष्मण जगताप यांच्या आत्मप्रेरणा या पुस्तकास ललित साहित्य विभागात साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उदघाटक म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री.जगन्नाथ शिंदे, सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार ,वक्ते ,व संमेलनाध्यक्ष श्री .रवींद्र कोकरे, जेष्ठ कवी अरुण पुराणीक ,जेष्ठ पञकार अरुण मेहता ,स्वागताध्यक्ष श्री .महादेव गुंजवटे प्रकाश सस्ते अध्यक्ष ॲग्रोन्युज परिवार तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले मराठी साहित्यावर प्रेम करणारे अनेक लेखक व कवी उपस्थित होते.