फलटण : सुमारे दोन महीन्यापासून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान,
स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकल वरून जाणा-या
येणा-या विशेषतः महिला/मुली यांना टार्गेट करून एक अनोळखी २० ते २२ वर्षे वयाचा चोरटा अंगाने सडपातळ शाईन मोटार
सायकल वरून त्यांचा पाठलाग करीत त्यांचे पाठोपाठ मोटार सायकल चालवित जात आजु बाजुला तसेच मागे पुढे कोण नाही
हे पाहून संधी मिळताच महीला च मुलीचे हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून,य जबरदस्तीने
हिसकावून याशिवाय रस्त्याने मोबाईल. फोनवर बोलत जाणा-या महिला/मुली यांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने ओढून
पोबारा करीत होता या भागात सदरच्या चो-या तो साधारण पणे आठ दिवसांचे फरकाने सातत्याने करीत होता.
भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सुमारे आठ ते दहा दिवसापासून
दररोज सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत वरील भागात रिक्षा मध्ये स्पिकर लावून विशेषत: महिला/मुली वर्गामध्ये एक अनोळखी
चोरटा वय अंदाजे २० ते २२ वर्षे वयाचा महीलाचे जवळील बॅग, पर्स, मोबाईल तसेच गळयातील मंगळसुत्र/ गंठण जबरदस्तीने
हिसकावून चोरून नेत असले बाबत सर्वानी सावधान राहून दक्षता घ्यावी तसेच सदर बाबत त्यांनी आपले स्वत:चा मोबाईल
नंबर व पोलीस ठाणेचा नंबर देवून असा काही प्रकार घडलेस किंवा कोणाला काही माहीती मिळाल्यास त्यांचे नांव जाहीर न
करता गोपनीय ठेवण्यात येईल या अटीवर अनाऊसमेंट करून जनजागृती करून जाहीर आव्हान करण्यात आलेले होते.
सदर शाईन मोटार सायकल वरील अज्ञात चोरटयांची व तो वापरीत असलेल्या वाहनांची मोठया कौशल्याने
माहीती प्राप्त करून दिनांक २३.०२.२०२१ रोजी वरील भागात महिला व मुलींना टार्गेट करून,गाडीचे बास्केट मध्ये ठेवलेली पर्स
तसेच मोबाईलवर बोलत असताना व हॅण्डलला लावलेली पर्स उचलून व मोबाईल हिसकावून घेवून जाणारा अज्ञात चोरटा हा
शाईन मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ सी एफ ७२५९ वरून त्याच पध्दतीने गुन्हे करण्यासाठी सदर भागात येत असल्याची
खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यातील श्री.भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एन आर
गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर,पोलीस हेड
कॉन्स्टेबल आर.एस.भोईर, पोलीस नाईक एस.डी.सुळ, पोलीस नाईक एन.डी.चतुरे, पोलीस नाईक एस.ए.तांबे, पोलीस नाईक
लावंड, पोलीस शिपाई अच्युत जगताप असे मोटार सायकल वरून पेट्रोलिंग व सापळा लावणे कामी रवाना होवून महाराजा
मंगल कार्यालय लक्ष्मीनगर फलटण येथे सापळा लावून थांबलेलो असताना माहीतील वर्णनाप्रमाणे व मोटार सायकल वरील
संशयीत अज्ञात चोरटा मिळून आल्याने त्यांस मोठया शिताफीने पकडून त्यांचे नांव विचारले असता त्याने त्यांचे नांव सुरेश
रमेश कदम वय २२ वर्षे मुळ राहणार धुळदेव सद्या राहणार भ्राम्हणगल्ली पाटणे यांचे चाळ फलटण ता फलटण जि
सातारा असे सांगितले.
आरोपी नामे सुरेश रमेश कदम वय २२ वर्षे मुळ राहणार धुळदेव सद्या रा. भ्राम्हणगल्ली पाटणे यांचे
चाळ फलटण यांस विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदर कालावधीत फलटण शहरातील लक्ष्मीनगर,
संजीवराजे गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय या भागात एकूण मालमत्तेचे ०९ गुन्हे
त्यापैकी ०३ जबरी चोरी, व ०६ चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले असून त्यांचे कब्जातून ०२ लॅपटॉप त्यात ०१ एसार
कंपनीचा, ०१ डेल कंपनीचा तसेच एकूण ११ मोबाईल हॅण्डसेट त्यात ०२ अॅपल कंपनीचा, ०४ सॅमसंग कंपनीचा, ०२
रेडमी कंपनीचा,०१ ओपो कंपनीचा, ०१ मोटो कंपनीचा,०१ रियलमी कंपनीचा व एक मोटार सायकल तसेच रोख
रक्कमेसह एकूण २,२४,८००/-रूपये किंमतीचा माल हस्तगत करणेत आलेला आहे.
तसेच चोरीचा मोबाईल हॅण्डसेट व चोरीचा लॅपटॉप घेणारे आरोपी नामे १.आशिष हेमंत अहिवळे वय २०
वर्षे रा सोमंथळी ता फलटण जि सातारा २.मयुर संजय साळवे वय २० वर्षे ३. सौरभ संभाजी जाधव वय २० वर्षे दोन्ही रा.
सुरवडी ता फलटण जि सातारा यांना गुन्हयाचे कामी अटक करणेत आलेली आहे. सदर आरोपी कडून आणखी तीन
मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करणेत आलेले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा.श्री.अजय कुमार बंसल सो.पोलीस अधिक्षक सातारा,मा.श्री.धिरज पाटील सो अपर पोलीस
अधिक्षक सातारा,मा.श्री. गणेश किंद्रे सो.उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग व
मा.श्री.तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री.भारत किंद्रे पोलीस
निरीक्षक फलटण शहर, एन आर गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस.एन. भोईटे सहाय्यक फौजदार,व्ही.पी.ठाकूर पोलीस
हेड कॉन्स्टेबल ,आर.एस.भोईर पोलीस हेड कॉन्स्टेबल ,पी.एस.मदने पोहेकॉ, एस.डी.सुळ पोलीस नाईक ,एन.डी.चतुरे पोलीस
नाईक,एस.ए.तांबे पोलीस नाईक,ए.एम.वाडकर पोलीस नाईक,एन.पी.भोसले पोलीस नाईक, व्ही.के.लावंड पोलीस नाईक ,
ए.एस.जगताप पोलीस शिपाई,डी.डी.नाळे पोलीस शिपाई यांनी केलेली आहे.
नगर,