कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु : जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सातारा दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर  लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 25.2.2021 रोजीच्या रात्री 00.00 पासुन ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. 
सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.  सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. हॉटेल, रिसॉर्ट,लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रु. 25 हजार दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रु. एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.  
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 नुसार  तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!