बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
रक्तदान शिबिर,वृषारोपन व वक्तृत्व स्पर्धा च्या माध्यमातून बारामती तालुक्यातील निरावागज येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिव प्रतिमेचे पूजन राज्य शासन च्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे,रंजन तावरे, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,जिल्हा बँक संचालक मदनराव देवकाते,सुनील पवार व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्तीत होते.रक्तदान शिबिरा मध्ये 101 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले मी वाचलेले छत्रपती,छत्रपतींच्या विचारांची आज गरज का? आदी विषयावर 55 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धे मध्ये सहभाग घेतला. मिरवणूक न काढता किंवा सत्कार न करता वृषरोपन चा संदेश सर्व दूर जावा उदेश्याने प्रत्येकास देशी झाडाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवस्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष घनश्याम डाळ,उपाध्यक्ष भानुदास साळुंखे,कार्याध्यक्ष माधव गाडे,सचिव निलेश जाधव व सुनील वाघ,उत्तम पन्हाळे,बाबूराव करांडे, ज्ञानेश्वर सणस, निलेश ढेकाने, सतीश घाडगे,हर्षद पन्हाळे,उद्धव डाळ,रामभाऊ गाडे,शरद गाडे,डॉ राजेंद्र जाधव,राहुल साळुंखे,चंद्रकांत शिंगाडे,शुभम पन्हाळे,संतोष पोपळे, ऋषिकेश निकम,संतोष गाडे,बाळासो जगताप,अक्षय शिंदे,माऊली प्रसाद अमराळे, रोनक जगताप,दादा चव्हाण,बाळू जगताप,संजय सागडे, पंढरीनाथ पन्हाळे,योगेश जगताप, यांनी कार्यक्रम चे आयोजन केले होते.” शिव विचार डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन जगायचे आहे हा विचार सर्व दूर जावा व शासनाच्या हाकेला प्रतिसाद घेऊन रक्तदान शिबिर व शिव विचार लहानपणी च विद्यार्थ्यांना कळावे म्हणून वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन केल्याचे ” अध्यक्ष घनश्याम डाळ यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार अनिल सावळेपाटील यांनी मानले.