बारामती (फलटण टुडे ) :कोरोना मुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा आणि भविष्यात येणाऱ्या कोरोना ची दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन व शिवजयंती चे औचित्य साधून रविवार दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी विश्व जन आरोग्य सेवा समिती व राजे प्रतिष्ठान यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छोटेसे खेडेगाव असून देखील गावातील ३१ तरुणांनी रक्तदान करून महाराजांना एक वेगळ्या प्रकारे मानवंदना दिली.
विश्व जन आरोग्य सेवा समिती ही एक सामाजिक संस्था असून सर्वच आरोग्य कक्ष मध्ये लोकांना मदत करत असते. मयुर चव्हाण हे विश्व जन आरोग्य सेवा समिती मध्ये पुणे जिल्हा प्रमुख म्हणून समाज कार्य करत असतात व अवघ्या महाराष्ट्र मध्ये कोणाला रक्ताची गरज भासली की ती पूर्ण करतात.