फलटण: फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. तदनंतर काल मंगळवार (दि. २३) व आज बुधवार (दि. २४) रोजी सरपंच व उपसरपंच निवडी संपन्न झाल्या. सरपंच- उपसरपंच निवडी दरम्यान तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या नेतृत्वाखालील राजेगटाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू असलेल्या विकासगंगेला खंडीत होऊ न देण्याचे काम तालुक्यातील जनतेने केले असून राजेगटाच्या पाठीशी फलटण तालुका ठामपणे उभा असल्याचे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यात राजेगटाने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायतींची नावे अनुक्रमे पुढील प्रमाणे: सरडे, कापशी, राजुरी, अलगुडेवाडी, सस्तेवाडी, हिंगणगाव, खुंटे, जिंती, मुंजवडी, तावडी, साठे, घाडगेवाडी, शिंदेनगर, कोळकी, सांगवी, नांदल, पिराचीवाडी, काशिदवाडी, जावली, शेरेशिंदेंवाडी, खराडेवाडी, ठाकुरकी, खामगाव, सासकल, तिरकवाडी, डोंबाळवाडी, रावडी बुद्रुक, सोनवडी खुर्द, घाडगेमळा, कापडगाव, भिलकटी, जाधववाडी (फ.), वाघोशी, कुरवली बुद्रुक, मुळीकवाडी, निरगुडी, बोडकेवाडी, गुणवरे, आळजापूर, फडतरवाडी, निंभोरे, कोऱ्हाळे, टाकळवाडा, जाधववाडी (ता.), वडजल, ढवळ, बिबी, होळ, सोनगाव, मलवडी, ढवळेवाडी (निं.), आंदरूड, नाईकबोमवाडी, तडवळे, झिरपवाडी, मुरुम, भाडळी बुद्रुक, काळज, आरडगाव, वडगाव, रावडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, शेरेचीवाडी (ढ.), शिंदेवाडी, कोरेगाव, धुळदेव, मिरढे, हणमंतवाडी, पवारवाडी.
कोरेगाव तालुक्यात राजेगटाने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रामपंचायतींची नावे अनुक्रमे पुढील प्रमाणे: नांदवळ, अनपटवाडी, चौधरवाडी, सोळशी, तडवळे (सं. वाघोली), वाठार स्टेशन, फडतरवाडी, दहिगाव, राऊतवाडी.