श्रीमती सीमा आबाजी गायकवाड व उपसरपंच सौ. नयन निलेश जगदाळे निवड झाली.
मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी सरपंच पदासाठी एकमेव श्रीमती सीमा आबाजी गायकवाड तर उपसरपंच पदासाठी सौ.नयन निलेश जगदाळे यांचे अर्ज दाखल झाल्याने यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.
फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत जाधववाडी सरपंच पदी श्रीमती.सीमा आबाजी गायकवाड व सौ. नयन निलेश जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली.
यानंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण,फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या