बारामती (फलटण टुडे ):
रथसप्तमीच्या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो, त्याचे औचित्य साधून बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या विविध योग अभ्यासकेंद्रांवर सूर्यनमस्कार साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये साधकांनी बीजमंत्रांसह 51 सूर्यनमस्कार घातले. सदर कार्यक्रमात बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,डॉ निलेश महाजन,डॉ भक्ती महाजन व इतर मान्यवर महिला, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
सूर्य ही तेजाची देवता आहे ,सुर्यामुळेच सर्व प्रकृतीचे कार्यचक्र सुरळीत सुरू असते, त्यामुळे प्रतिदिन सुर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे महत्वाचे आहे. वेदांमध्ये आरोग्यम् भास्कराम् इच्छेत असे सांगितले आहे म्हणजे आरोग्याचे वरदान सूर्य देवतेकडे मागावे, त्यामुळे आजच्या कोरोनाच्या जागतिक संसर्गजन्य आजारांच्या काळात या साधनेद्वारे आपण सर्व विश्वाच्या आरोग्याचे वरदान सूर्याकडे मागूया, असे बारामतीतील प्रसिद्ध योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी सांगितले
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान शाखेचे संचालक डॉ जयदीप निकम यांनी योग अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार च्या फायद्याविषयी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
डॉ निलेश महाजन यांनी विद्यार्थ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार करून घेतले व त्यातील प्रकारांचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये एकूण 100 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व online पद्धतीने सहभाग घेतला.
मीना कानडे, सोनाली ठवरे, डॉ अमिता दोभाडा, शीतल गायकवाड, ऋतुजा जामदार, आशा पाटील, तेजस्विनी राऊत, शरयू नरुटे, नीलम भट, सोनाली गायकवाड, स्मिता देवकर, विद्या जाधव या विद्यार्थिनीं कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. निलेश महाजन, विद्या जाधव, शिल्पा खुमकर यांनी साधकांची शारीरिक तयारी करून घेतली.