चौकट: महापुरुषांच्या जयंती,मिरवणूक,आतिषबाजी वर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा महापुरुषाचे वशंज आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत त्यांना मदत करून जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजेत हा उपक्रम युवकांनी,मंडळांनी पुढे चालू ठेवावा या साठी शहर पोलीस स्टेशन ने पुढाकार घेऊन सुरुवात केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितली.
शिवजयंती निमित्त बारामतीकराची तानाजी मालुसरे यांच्या वशंज यांना मदत शहर पोलीस स्टेशन चा अनोखा उपक्रम
तानाजी मालुसरे यांची कवड्याची माळ दाखवून माहिती देताना डॉ शीतल मालुसरे व शेजारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
बारामती (फलटण टुडे ):
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी न करता शहरातील मंडळाचे प्रतिनिधी याना एकत्र करून नरवीर तानाजी मालुसरे यांचे वशंज यांचा सन्मान करून त्यांना आर्थिक मदत गोळा करून देत शहर पोलीस स्टेशन नि आगळेवेगळी शिवजयंती साजरी केली.
गड आला पण सिंह गेला नरवीर तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी दिलेली कवड्याची माळ घेऊन बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे 12 वे वंशज शितलताई मालुसरे,कन्या देवयानी मालुसरे यांना खास शिवजयंती निमित्त आमंत्रित करण्यात आले होते.
त्या काळी मावळ्यांचे योगदान खूप मोठे होते पण आता त्यांचे वंशज आर्थिक दृष्ट्या खचलेले आहेत त्यांना सन्मान पेक्षा शासकीय व समाज्यातील दानशूर व्यक्तीं,संस्था,मंडळ च्या मदतीची गरज आहे ही गरज ओळखून शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तानाजी मालुसरे यांच्या वशंज यांना शिवजयंती निमित्त आमंत्रित केले होते. बारामती शहरातील शिवजयंती मंडळ यांना आव्हान करून छोटासा सत्कार चे आयोजन केले होते. या प्रसंगी शिवजयंती मंडळ चे प्रमुख पदाधिकारी उपस्तीत होते.
19 फेब्रुवारी रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये शिवप्रतिमा पूजन करून रविवारी मालुसरे यांच्या वंशज याचा सन्मान व छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांचे मैत्री,स्वराज निष्ठ व कवड्याची माळेचे महत्व नामदेव शिंदे यांनी सांगितले.
मालुसरे यांचे वशंज सद्या आर्थिक अडचणी मध्ये आहेत त्यांना राहण्यास हक्काचे घर नाही अनेक ठिकाणी जमिनी,वतन या बाबत शासनाकडे पाठपुरावा चालू आहे तर काही ठिकाणी कोर्ट कचेऱ्या मध्ये प्रकरण प्रलंबित आहेत.
चौकट:मालुसरे यांच्या वशंज यांचा सन्मान पोलीस स्टेशन मध्ये शिवजयंती निमित्त करणे हे आमचे भाग्य समजतो व सामाजिक बांधीलकी जपत शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल समाधान होत असल्याचे तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ शीतल मालुसरे यांनी सांगितले.या प्रसंगी अनिल सावळेपाटील,ऍड सुप्रिया बर्गे,प्रा सुजित वाबळे,हेमंत नवसारे आदी उपस्तीत होते