होम मिनिस्टर च्या माध्यमातून समाज प्रबोधन
बारामती (फलटण टुडे ):
तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शिवजयंती निमित्त महिला व मुलीचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले या वेळी जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे,बेबीताई आहेरकर,प्रमोद चांदगुडे व श्री भैरवनाथ तरुण मंडळ चे अध्यक्ष अक्षय चांदगुडे व सर्व सभासद व महिला,मुली मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या.
शिव जयंती निमित्त कोणताही सत्कार व मिरवणूक न काढता वृषारोपन करून व महिलांसाठी कला गुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्यावे म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन करून महिलांचा व मुलींचा सन्मान करण्यात आला .या मध्ये होम मिनिस्टर विजेत्या प्रथम क्रमांक संगीता जालिंदर चांदगुडे दुसरा श्यामल तुकाराम चांदगुडे तर तिसरा क्रमांक सुप्रिया संग्राम चांदगुडे यांनी पटकाविला. शिवकालीन व एतेहसिक प्रश्न मंजुषा उखाणे,विविध खेळ, व मुलगी वाचवा ,पर्यावरण वाचवा आदी विषय होम मिनिस्टर च्या माध्यमातून सादर करण्यात आले.होम मिनिस्टर चे सादरीकरण अनिल सावळेपाटील यांनी केले तर बेटी बचाओ ही गीते सलीम सय्यद यांनी सादर केली. आभार अमोल चांदगुडे यांनी मानले.