बाळासाहेब डेरे व गुरुदेव सरोदे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: (फलटण टुडे वृत्तसेवा )
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियनचे (फेरेरो इंडिया) संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल सेक्रेटरी बाळासाहेब डेरे व आय एस एम टी कंपनी कामगार संघटना चे जनरल सेक्रेटरी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल सचिव गुरुदेव सरोदे यांचा सत्कार बारामती एमआयडीसी मधील विविध कामगार संघटना व कंपनी प्रशासन यांच्या वतीने करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवजीराव खटकाळे ,आय एम डी कामगार समन्वय संघटना वालचंदनगर चे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, जनरल सेक्रेटरी प्रविण बल्लाळ, डायनॅमिक्स डेअरी युनियन चे अध्यक्ष नानासाहेब थोरात, सुयश अॅटो प्रा लि युनियन चे अध्यक्ष भारत जाधव, सरचिटणीस पोपट घुले, पियाजो व्हॅईकल युनियन चे ज. सेक्रेटरी तानाजी खराडे, दुध संघ बारामती चे अध्यक्ष राहुल देवकाते, आय एस एम टि प्रा. लि. बारामती युनियन चे अध्यक्ष कल्याण कदम आदी उपस्थित होते.
” कामगारांचे उत्कृष्ट वेतन करार,कामगार व कुटुंबातील सदस्य यांच्या साठी पतसंस्था, सोसायटी ची स्थापना,कामगारांच्या विविध प्रश्ना साठी अहोरात्र केलेले कार्य म्हणून शासन दरबारी गुणवंत पुरस्कार मिळाला आहे हे कौतुकास्पद कार्य बारामती एमआयडीसी मध्ये डेरे व सरोदे करीत असल्याचे शिवाजीराव खटकाळे यांनी सांगितले.
सुदर्शन जांनभरे यांनी स्वागत केले तर किरण तावरे यांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी बारामती,पणदरे,कुरकुंभ, वालचंदनगर आदी परिसरारील कामगार प्रतिनिधी उपस्तीत होते.