कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायजूस कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

बारामती ( फलटण टुडे ):
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील दोन शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. प्रथमवर्ष अभियांत्रिकीला ऍडमिशन घेण्यासाठी सुद्धा विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयालाच पसंती दिली आहे. 
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा ऑनलाईन लर्निंगकडे कल वाढला आहे. अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पुरवण्याच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.साहजिकच वाढत्या मागणीमुळे आता ऑनलाईन लर्निंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. बायजूस हि भारतातील शैक्षणिक तंत्रज्ञान आणि ऑनलाईन लर्निंग या क्षेत्रात काम करणारी नामांकित कंपनी आहे. 
महाविद्यालय आणि बायजूस या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये ३ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: – कोमल कांबळे (सिविल इंजिनीरिंग), ओंकार राजमाने (इ अँड टीसी), इम्तियाज मोहम्मद (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग). या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे १० लाख रुपये पर्यंत वार्षिक पगाराचे पॅकेज देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट जास्तीत जास्त दर्जेदार नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम करत आहे तसेच येणाऱ्या काळात हि विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट साठी विशेष प्रयत्न केले जातील अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली. इंटरव्ह्यू प्रोसेस यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीम मेंबर प्रा. डॉ. रवींद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ. सुनेत्राताई पवार, सचिव अ‍ॅड. निलीमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार आणि मॅनेजमेंट कौन्सिलचे मेंबर्स, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आणि त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अनेक ऍड ऑन कोर्सेस, ऑनर आणि मायनर डिग्री प्रोग्रॅम्स इत्यादी उपक्रम सुरु केले आहेत अशी माहिती डॉ. आर एस बिचकर यांनी दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!