सातारा दि. 19 (जि.मा.का.) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते