बारामती ( फलटण टुडे ):
गणतंत्र दिवस परेड मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनीच्या सक्रिय सहभागबद्दल विशेष सत्कार
२६ जानेवारी २०२१ रोजी राजपथ दिल्ली येथे झालेल्या गणतंत्र दिवस परेड मध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु राजश्री मानेने Contingent Commander ची जागा भूषवली. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथसंचालनात केवळ १०० स्वयंसेवकांना संधी मिळाली. राजश्री लक्ष्मणराव माने ही राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, बारामती येथे स्थापत्य विभागात चतुर्थ वर्षात शिकत आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय युवा महोत्सव सांगता समारंभ दि १६ जानेवारी २०२१ रोजी डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर नवी दिल्ली येथे पार पडला. या समारंभास युवा आणि खेळ मंत्री किरेण रिजिजू, वस्त्र महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृति ज़ूबिन इरानी तसेच युवा मंत्रालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राची लोककला लावणी सादर करण्यात आली. या मध्ये तिने मोलाची भूमिका पार पाडली.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवारसाहेब हे प्रेरणाश्रोत असलेल्या कु राजश्रीचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ. सुनेत्राताई पवार, सचिव अॅड. निलीमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, श्रीश कंबोज, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
या तिच्या यशाकरिता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्रिय संचालक मा. कार्तिकेय सर, राज्यसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य व पुणे विद्यापीठ रा. से. यो. संचालक डॉ. प्रभाकर देसाई तसेच मा. अजय शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वामीराज भिसे, महाराष्ट्र contingent Leader प्रा शालिनी घुमारे, प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर तसेच महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक सोनवणे आणि प्रा उमेश जगदाळे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.
राजश्री आपल्या यशाचे श्रेय सर्व मार्गदर्शकांसह वडील लक्ष्मणराव माने व आई शिलादेवी माने यांना देते.
Really Rajashri Mane have done her best in NRDC 2021. Proud of her…👍💐