मा.श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांच्या शुभहस्ते* *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषकचा शुभारंभ*

फलटण दि.१५ : राज्यस्तरीय व तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक २०२१ चा उदघाटन समारंभ फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. घडसोली मैदान येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी फलंदाजी करत क्रिकेटचा आनंद लुटला.

यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक असिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, अँड.सागर सस्ते, गणेश शिरतोडे, पै.पप्पू शेख, राहूल कुंभार, किरण जगताप, अमोल भोईटे, अँड.विजय कदम, अमोल निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत सत्यजीतराजे गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, विद्यानगर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राहुल निंबाळकर (भैया), अध्यक्ष, श्रीमंत रामराजे युवा मंच यांच्या माध्यमातून सोमवार, दिनांक १५ रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय व तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक २०२१ चा उदघाटन समारंभ श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक २०२१ या क्रिकेट स्पर्धांसाठी फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण पोलीस स्टेशन, सागर सस्ते, सचिन भोसले, अतुल कोठाडिया, मयूर कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

दरम्यान, घडसोली मैदान येथे येथे होत असलेल्या या क्रिकेट सामन्यांसाठी विविध संघ सहभागी झाले आहेत. वरील स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनेलवर करण्यात आले आहे, त्याचा लाभ क्रिकेटप्रेमीनीं घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!