बारामती ( फलटण टुडे ): विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीच्या संधी देण्यासाठी प्रसिद्ध असणारे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयतर्फे दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोलाबेरा सर्विसेस प्रा. लि. कंपनीच्या ऑनलाईन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.
कोलाबेरा सर्विसेस प्रा. लि. कंपनीतर्फे प्री प्लेसमेंट टॉक, ऑनलाईन ऍप्टिट्यूड, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू इत्यादी राऊंड घेण्यात आले. यातून महाविद्यालयातील ०६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड कंपनीद्वारे करण्यात आली आहे. नोकरीसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: प्रशांत कदम (इ अँड टीसी इंजिनीअरिंग), विशाल गोवेकर (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग), हृषीकेश दीक्षित (मॅकेनिकल इंजिनीअरिंग), अक्षय पोटे (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), मित्तल ओसवाल आणि प्रियांका मणियार (कॉम्पुटर इंजिनीअरिंग).
कोलाबेरा हि अमेरिकन कंपनी आहे ज्याचे मुख्यालय बास्किंग रिज, न्यू जर्सी येथे असून हि कंपनी जगभरातील नामांकित कंपन्यांना व्यावसायिक माहिती तंत्रज्ञान भरती, कर्मचारी, सल्लामसलत आणि व्यवसाय सेवा पुरवितात. या कंपनीचे एशिया पॅसिफिक मुख्यालय गुजरातमधील वडोदरा येथे आहे. कोलाबेरा कंपनीची युनायटेड स्टेट्स, भारत, फिलिपिन्स, सिंगापूर, कॅनडा, युनायटेड किंगडम, आयर्लंड आणि मलेशिया येथे कार्यालये आहेत.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट सतत विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असते याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राइव्हस आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांकडून ऍप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्युनिकेशन, इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाते अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल कोरे यांनी दिली.
हा ऑनलाईन ड्राईव्ह यशस्वी होण्याकरीता ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमचे मेंबर प्रा.सुरज कुंभार, प्रा.श्रीकृष्ण कोल्हार, प्रा.हाफिज शेख, सहाय्यक चारुदत्त दाते आणि गणेश खलाटे यांनी विशेष सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ. सुनेत्राताई पवार, सचिव अॅड. निलीमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार आणि मॅनेजमेंट कौन्सिलचे मेंबर्स, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी व समाजातील इतर नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी महाविद्यालय भरपूर प्रयत्न करत आहे. येणाऱ्या दिवसात विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी अधिकाधिक उपक्रम राबविण्याचा मानस प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी केला आहे.