सातारा : जिल्हा बँकेची निवडणूक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण व सगळे पक्ष एकत्र येवून लढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बँक पूर्वीसारखी राजकारणविरहीत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्षविरहीत बँक ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजमितीला तर आमची ही भूमिका आहे. उद्या काय होणार, हे मी आज सांगू शकत नाही. बँक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनेच चर्चा सुरू आहे. सर्वजण आघाडीतील प्रमुख लोक बसून आम्ही चर्चा करणार आहे. कोणाला कसे वाटप करायचे याची चर्चा झाली नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर चर्चा सुरू होतील. जे लढायचे म्हणतील त्यांच्याबरोबर लढाईची तयारी ठेवू