विद्यार्थ्यांने केला गुरूचा अनोखा सत्कार …..

  श्री छत्रपती हायस्कुल काटेवाडी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पप्पू राऊत

बारामती (फलटण टुडे ) : कोणतेही व्यक्ती जीवनात कायम विद्यार्थी असते त्यास वयाचे बंधन असत नाही त्यामुळे 17 वर्षानंतर विद्यार्थ्यांने सर्व गुरूंना एकत्रित करून अनोखा व आगळा वेगळा सत्कार करून शिक्षकांना आनंदाची अनोखी भेट दिली आहे.
त्याचे असे झाले बारामती येथील आशीर्वाद मच्छिं ढाबा चे संचालक पप्पू राऊत हे श्री छत्रपती हायस्कुल काटेवाडी येथे दहावीला 2003 मध्ये होते परंतु घरची गरीबी त्यामुळे लहान वयात काम करावे लागत असल्याने अभ्यासा कडे दुर्लक्ष होत असे त्यामुळे 5 विषय जाऊंन नापास होण्याची वेळ आली शालेय जीवना पासून कबड्डी खेळाची व मुलाचे संघटन करण्याची जबरदस्त आवड होती.त्यामुळे विविध ठिकाणी असलेल्या स्पर्धे मध्ये कबड्डीचा संघ उतरत असे व राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंतचे  विजय खेचून आणला जाई.
अभ्यासात प्रगती नाही व कबड्डी मध्ये प्रगती होत असल्याने घरच्या मंडळींनी   भिगवण येथे मामा कडे हॉटेल मध्ये कामास ठेवले त्यानंतर विविध ठिकाणी काम करीत अखेर छोटेसे स्वतः चे खास मच्छिं हॉटेल भाड्याच्या जागे मध्ये सुरू केले व  जिद्द चिकाटी च्या जोरावर त्यानंतर शहरातील प्रसिद्ध मच्छिं ढाबा बनविले.
या दरम्यान कधीही गुरूंना व शाळेतील शिक्षक,लेखनिक व शिपाई यांना सुद्धा पप्पू राऊत विसरले नाही आता प्रयन्त ज्यांनी शिक्षण  शिकवले ते शिक्षक व लेखनिक,शिपाई  असे  सर्व 25 जणांना  एकत्रित आणत त्यांचा खास फेटा बांधून व रोपटे देऊन  सत्कार केला,त्यांचे विचार ऐकून  व शालेय जीवनात  चुकले असेल तर माफ करा अशी माफी मागून   , अभ्यासात नापास झालो परंतु आपल्या संस्कारामुळे जीवनात व व्यवसायात यशस्वी झालो हे सांगून सत्काराची गुरुदक्षिणा दिली. 
या प्रसंगी प्रत्येक शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आणि आठवणी सांगताना अश्रूंना बांध मोकळा करून दिला व एकटा विद्यार्थी शिक्षकांचे या सत्काराच्या माध्यमातून ऋण फेडतो या बदल समाधान व्यक्त केले.
राऊत यांनी  देशी झाडाचे वृक्ष सवर्धन व्याहवे म्हणून प्रत्येकास लिब,आंबा,चिंच,शेवगा आदी रोपटे देऊन सत्कार केला.
या प्रसंगी सर्व शिक्षक,लेखनिक,शिपाई,राऊत परिवारातील सर्व सदस्य उपस्तीत होते.
“जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाल्यावर गुरू शिष्याची भेट ही परंपरा बंद करू नका कारण पश्चिमात्य संस्कृती मुळे विद्यार्थी व शिक्षक हे नाते दुरावले जात आहे व व्यवसायिक होत आहे त्यामुळे यशस्वी झाल्यावर शिक्षक व इतर स्टाफ चे आभार माना व काही चुकत असेल तर माफी मागा व वृक्ष संवर्धन चळवळ पुढे न्या” असा सल्ला या वेळी प्पू राऊत यांनी दिला.
Share a post

0 thoughts on “विद्यार्थ्यांने केला गुरूचा अनोखा सत्कार …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!