सातारा दि. 12 (जिमाका):विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे Mahadbt.gov.in ऑनलाईन प्रणालीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत अंत्यत कमी नोंदणी झालेली आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठीची नोंदणी करावी व त्यांचे अर्ज नियमानुसार तपासून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावे. तसेच शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.