सातारा, दि. 11 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. कार्यकारी समिती बैठक (स्थळ : बँकेचे मुख्य कार्यालय, सातरा). नंतर सातारा येथून मोटारीने फलटणकडे प्रयाण मुक्काम फलटण.
शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. श्री महाराज ज्वेलर्स नवीन सवुर्णदालनाचा उद्घाटन समारंभ. दुपारी 3 वा. महाराष्ट्र राज्य वारकरी माडळ पदग्रहण समारंभ (स्थळ : महाराजा मंगल कार्यालय, फलटण). सोयीनुसार फलटण येथून मोटारीने वाळु पाटलीची वाडी, लोणंद ता. खंडाळाकडे प्रयाण. सायं. 6 वा. ग्रामपंचायत सत्कार समारंभ. मुक्काम फलटण.
रविवार दि. 14 व सोमवार दि. 15 फेब्रुवारी रोजी फलटण राखीव, मुक्काम.
मंगळवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सोयीनुसार फलटण येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.