सातारा, दि. 11 (जिमाका): वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम/ विभाग या संवर्गात देण्यात येतो. पुरस्काराचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी असा असून अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग डी.डी. सालविठ्ठल यांनी कळविले आहे.
Post Views: 64