खेळाडू चा सन्मान करताना मान्यवर
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
दिनांक. ६ व ७ फेब्रुवारी दरम्यान चौथ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा चंद्रशेखर आगाशे कॉलेज गुलटेकडी (पुणे) या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजक संतोष चोरमले (अध्यक्ष पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशन) होते. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम शर्मा सचिव( सांबाे फेडरेशन ऑफ इंडिया ), सनी वाघचौरे (गोल्डन गाईज) होते. तसेच अॅड. स्मिता निकम (अध्यक्ष ज्युदो ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) याही उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये ज्ञानसागर गुरुकुल मधील कुमारी-आर्या समीर कांबळे (इ.3री )प्रथम (गोल्ड मेडल), कुमार-अथर्व समीर कांबळे(इ.7वी) प्रथम (गोल्ड मेडल)मिळवून राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही स्पर्धकांची निवड पंजाब (रोहतक )येथे होणाऱ्या राष्ट्रीय सांबाे स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे,कार्याध्यक्षा प्रियांका डायरेक्टर अलका आटोळे, डायरेक्टर पल्लवी सांगळे,डायरेक्टर दीपक बिबे,सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे, नीलिमा देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.