उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार 2020-21 18 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


                सातारा, दि. 10 (जिमाका): युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरु युवा संगठन मार्फत उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कारासाठी मंडळाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्य करण्या-या युवा मंडळास जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळीवर पुरस्कार देण्यात येतो.
                जिल्हा पातळीवर निवड केलेल्या युवा मंडळास रु 25 हजार राज्य पातळीवर रु. 1 लाख राष्ट्रीय पातळीवर रु. प्रथम रु. 5 लाख द्वितीय रु. 3 लाख  तृतीय रु.2 लाख अशा तीन क्रमांकामध्ये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र या स्वरुपात युवा मंडळास पुरस्कार दिला जातो.
                पुरस्कार निवडीसाठी मंडळाने रक्तदान, वृक्षारोपन, व्यसनमुक्ती, साक्षरता, एड्स निर्मूलन, पाणलोट क्षेत्र विकास, राष्ट्रीय एकात्मता, मोलमजुरी निर्मूलन, आपत्कालीन सहाय्य, ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम रोजगार निर्माण, प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा बँक योजना, कुटुंब कल्याण, बचतगट , क्रीडा कौशल्य, पल्स पोलिओ, साक्षरता कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम, महिला सशक्तीकरण , रोजगार निर्मिती, स्व्च्छता मोहिम, वाईट चालीरिती विरोधी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय दिन व इतर समाज कल्याणाचे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे युवा मंडळाचे मुलगी वाचवा अभियान, स्वच्छ भारत समर इंटरशिप कार्यक्रम कुटुंब कल्याण नियोजन,  बचतगट यासाठी केलेले कार्य विशेष विचारात घेतले जाईल. पुरस्कारांसाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीतील कार्य व कार्यक्रमाचे मुल्यांकन करुन पुरस्कार निवडले जातील या पुरस्कारासाठी अर्ज करणरे युवा मंडळ 3 वर्ष अगोदरच नोंदणीकृत असावे.
                याबाबत सविस्तर अहवाल पूर्ण कार्यक्रमाचे माहितीसह फोटेा, वर्तमानपत्र कात्रण,कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका इत्यादी माहितीसह आणि विहित नमुन्यातील अर्ज सविस्तर माहितीसह नेहरु युवा केंद्राकडे दि. 18 फेब्रुवारी 2021  पर्यंत जमा करावेत. असे आवाहन सातारा जिल्ह्यातील युवा मंडळे व महिला मंडळांना जिल्हा युवा अधिकारी,श्री. गोपी तिर्री यांनी केले आहे. अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र सातारा या कार्यालयाशी संपर्क साधावा.दुरध्वनी क्रमांक – 02162- 229752

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!