सातारा दि. 10 (जिमाका) : तलाठी महापदभरती 2019 ची अंतिम निवड व प्रतिक्षा निवड यादी प्रशासकीय कारणास्तव आज रोजी प्रसिध्द करण्यात आलेली नसून सदरची यादी नंतर प्रसिध्द करण्यात येणार असल्याची नोंद दि. 11 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा निवड यादीमधील सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.