कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गुरुदेव सरोदे
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील आय एस एम टी कंपनी मधील गुरुदेव शिवाजी सरोदे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०१५ प्रदान करण्यात आला.
सरोदे हे सन १९९४ पासून आय एस एम टी कंपनी बारामती येथे कामगार म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.त्यांच्या या कामाची दखल राज्य सरकारने घेतल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला. दिलीप वळसे-पाटील कामगार मंत्री , माननीय बच्चू कडू कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्रीमती विनिता वेद सिंगल (भा प्र से) प्रधान सचिव कामगार विभाग यांच्या हस्ते तर डॉ महेंद्र कल्याणकर ( भा प्र से) कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य,रविराज इळवे. कल्याण आयुक्त मुंबई. यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, पदक ,स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आय एस एम टी कंपनी चे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भापकर व संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम व इतर कामगार, अधिकारी व बारामती परिसरातील विविध कामगार संघटना प्रतिनिधी यांनी सरोदे यांना शुभेच्छा दिल्या.