फलटण दि.६ (फलटण टुडे ) :
मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर काँलेज फलटण अंतर्गत मालोजीराजे अभ्यास केंद्र वार्षिक सभा पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या मध्ये पार पडली या वेळी ते बोलत होते.
मा. श्रीमंत रामराजे नाईक निबाळकर (सभापती विधानपरिषद ,महाराष्ट्र राज्य)
मा.श्रीमंत रघुनाथ राजे निंबाळकर (चेअरमन ,बाजार समिती ,फलटण) व श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष जि.प .सातारा यांच्या मार्गदर्शना खाली अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली.
फलटण आणि परिसरातील सर्व गरिब विद्यार्थ्यांना CET, NEET, JEE ,AIEEE या विविध परिक्षा मार्गदर्शन मिळावे . योग्य ती दिशा मिळावी. व पुढील शैक्षणिक क्षेत्रात करिअर साठी योग्य दिशा मिळावी. म्हणून या अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास केंद्रांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे प्रतिपादन प्रशालेचे प्राचार्य श्री. कोळेकर सर यांनी केले.
या वेळी रसायनशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख श्री.प्रा. संजय वेदपाठक याची प्रशालेच्या उपप्राचार्य पदी नेमणुक झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला .
या वेळी भौतिकशास्त्र विभाग वतीने श्री. प्रा.लाळगे सर व श्री.प्रा.राजेंद्र कदम यांनी माहिती दिली. रसायनशास्त्र विभाग च्या वतीने श्री.प्रा. वेदपाठक सर व श्री.प्रा.खरात सर व जिवशास्र विभाग च्या वतीने सौ.प्रा.कदम .पी.व्ही यांनी सखोल माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रा.इंगवले मँडम केले. प्रस्तावना श्री.प्रा.खरात सर तर आभार श्री. अजित देशमुख सरांनी मानले.