जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
खास महिलांसाठी कोकण परिसरातील पर्यटन व्हावे व एसटी चे उत्त्पन्न सुद्धा वाढावे या उदेश्याने बारामती एमआयडीसी एसटी आगार यांच्या वतीने फक्त महिलांसाठी ट्रिप चे आयोजन करण्यात आले होते.
आगारा तर्फे प्रेक्षणीय स्थळा साठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे , बारामती मधून सौ ज्योती गणेश जाधव यांच्या प्रयत्नातून बारामती ते गणपती पुळे, मार्लेश्वर
व परिसर स्थळी फक्त महिला साठी हि ट्रीप आयोजित करण्यात आली होती महिला सहसा सहलीला एकट्याने घराच्या बाहेर पडत नाही त्यांना घर कामातून वेळ भेटत नाही. परंतु ज्योती जाधव यांनी सर्व महिलांना एकत्र आणत 2 दिवसीय कोकण ट्रीप यशस्वी करून दाखवली या कामी एमआयडीसी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री भैरवनाथ दळवी यांनी मार्गदर्शन केले तसेच या बस वर चालक म्हणून श्री प्रदीप तावरे व वाहक म्हणुन श्री नितिन भागवत यांनी काम पाहिले.