फुले एज्युकेशन तर्फे अकोट येथे पहिला नोंदणी केलेला 24 वा सत्यशोधक विवाह वैभव डांगरे आणि अंकिता लहाने यांचा मार्मिकपणे प्रबोधन करणारा ठरला.
अकोट (फलटण टुडे वृत्तसेवा ) :फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि.4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ११.३० वाजता श्री नंदीकेश्वर मंदिर संस्थान,अकोट येथे सत्यशोधक चळवळीचे वक्ते वैभव सुभाष डांगरे (बीकॉम)आणि सत्यशोधिका अंकिता सतीश लहाने(१२ वी) यांचा विधीकर्ते सौ मायाताई व डॉ ज्ञानेश्वर गोरे,यवतमाळ हे अंधश्रद्धा ,कर्मकांड याला फाटा देत महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीने 24 वा सत्यशोधक विवाह लावला .तर पदमाकर बोरोडे यांनी सुरेल आवाजात महात्मा फुले रचित मंगला मंगलाष्टके आणि सुरवातीला स्वरचित जोती सावित्री वंदनाने फुलेमय वातावरण तयार केले.यावेळी वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र तसेच थोरसमाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि युवक कॉंग्रेस चे अकोला जिल्हा अध्यक्ष ऍड..महेश सुधाकर गणगणे यांचे शुभहस्ते भेट दिली. या विवाहासाठी मंगेश चिखले सभापती ,पाणी पुरवठा अकोला ,नगरसेवक सागर बोरोडे,मयुर निमकर,खोब्रा कमांडो शुभम बोरुडे ,पत्रकार संतोष विणकें,युवराज सावंत उपस्थित होते तर नगरसेविका दिपाली केवटी यांनी वधू वर यांना नारळ आणि आंब्याचे मोठे झाड पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे जगवा पर्यावरण वाचवा हा संदेश दिला .आणि डांगरे आणि लहाने परिवाराने सर्व मान्यवरांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व महिलांना सावित्रीबाई संघर्ष ग्रंथ भेट दिले.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की या आधुनिक काळात विवाह करताना पचांग ,मुहूर्त न पहाता ३६५ दिवसा पैकी कोणताही दिवस ,वेळ पाहून सत्यशोधक पद्धतीने विवाह करावेत असे आव्हान करून सत्याचा अखंडाचे गायन केले तसेच लहाने आणि डांगरे कुटुबीयांनी हा सत्यशोधक सोहळा महाराष्ट्रमध्ये प्रथमच खऱ्या अर्थाने प्रबोधनात्मक आयोजित केला त्याबद्द्ल दोन्ही परिवाराचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन अभिनदन केले . यावेळी फुले भीमगीताचा ऑर्केस्ट्रा गायक वैष्णव बोरोडे आणि गायिका सोनिया दुधांडे आणि त्यांचे कलापथक यांनी अतिशय मार्मिक प्रबोधन गाणी गाऊन महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर यांच्या जीवनपट सांगून या सत्यशोधक विवाहास मोठी उंची प्राप्त करून दिली .तर विवाह मंडपात वधू वर यांनी महात्मा फुले आणि भारताचे संविधान हातात घेऊन फुलांच्या पायघड्यांवरून आगमन करून सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व सम्राट बळीराजा फोटोला हार अर्पण करीत दीपप्रज्वलन केले.
या सोहळ्याची प्रथमच अकोट शहरात सत्यशोधक विवाह रजिस्टरमध्ये नोंदणी करून विवाह झाल्याने या आदर्श विवाह सोहळा हजारो लोकानी पाहून दोन्ही कुटुबीयांनचे व पुणे वरून येऊन रघुनाथ ढोक यांनी सोहळा पार पाडला म्हणून कौतुक केले तसेच अनेकांनी आम्ही याच पद्धतीने विवाह करून अक्षता म्हणून तांदूळ नासाडी न करिता फुले वापरणार असेही म्हंटले.
या सोहळ्यासाठी शिवम बोरोडे,हरीश यावले ,प्रथमेश बोरुडे,तुषार चिमोटे यांनी बहुमोल मदत केली तर स्वागत धीरज लहाने आणि शेवटी आभार रघुनाथ ढोक यांनी मानले.