जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
दि. 30 रोजी मराठा सेवा संघाची येथे बैठक पार पडली. या वेळी सालाबाद प्रमाणे येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजीत करण्यात शिवजयंती चे नियोजन करण्यात आले. ही बैठक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री दिगंबर (राजेन्द्र)डुबल यांच्या उपस्थीत पार पडली. या वेळी मराठा सेवा संघ पुणे जिल्हा सचिव शिवश्री महेश घाडगे, उध्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवश्री दीपक भराटे, संभाजी ब्रिगेड चे विविध पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे व इतर कक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थीत होते.
या वेळी मराठा सेवा संघ पुणे जिल्हा (पुर्व) उपाध्यक्ष पदी शिवश्री प्रशांत तावरे यांची व पुरंदर तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी शिवश्री चंद्रशेखर गरूड यांची निवड करण्यात आली. या वेळी मराठा सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे व उपाध्यक्ष शिवश्री प्रविण ननवरे उपस्थीत होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री दिगंबर (राजेन्द्र) डुबल यांनी मार्गदर्शन केले.