सातारा दि. 29 : राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2020-21 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये 20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे या योजनेसाठी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत एका शेळी गटाची किमत रु. 2 लाख 29 हजार 400 इतकी असुन सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देय असणार आहे. हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
तसेच राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2019-20 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये 2 देशी किंवा संकरीत गाई किंवा 2 म्हशींचा गट वाटप करणे या योजनेसाठी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करावेत.
या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांस 2 देशी किंवा संकरीत गाई गट खरेदी व वाहतूकसह 50 टक्के अनुदान रक्कम रुपये 56 हजार किंवा 2 म्हैस गट खरेदी व वाहतूकसह 50 टक्के रक्कम अनुदान रुपये 66 हजार देय असणार आहे.
हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अर्जासोबत सादर करावयाची आवयक कामगदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायात समिती यांचेशी सपर्क साधावा असे आवाहनही श्री. परिहार यांनी केले आहे.