जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
त्रिवेणी कट्टा च्या माध्यमातून महिलांना रोजगार व नौकरी मार्गदर्शन उपलब्ध होत असताना महिलांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळत असल्याचे हाय टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
दि. ३१ जानेवारी रोजी त्रिवेणी आॅईल अॅन्ड फुड प्रोड्क्टस् व चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रुई येथे हळदी कुंकु कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सौ सुनेत्रा अजित पवार मार्गदर्शन करीत होत्या.
या वेळी नगराध्यक्षा सौ पोर्णिमा तावरे, नगरसेविका डाॅ सुवासिनी सातव,सौ अमृता भोईटे पोलिस नाईक ,सौ लता भोसले माज़ी जिल्हा परिषद सदस्या सविता चौधर सौ राणी जगताप सौ रोहिणी आटोळे आदी मान्यवर महिला ऊपस्थित होत्या
त्रिवेणी आॅईल अॅन्ड फुड प्रोड्क्टसच्या संचालिका सौ शुभांगी वसंत चौधर व चंदुकाका सराफ अॅन्ड सन्सच्या संचालिका सौ नेहा किशोर शहा(सराफ)यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला