बारामती ( फलटण टुडे ):
विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २४ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हेमंत बबन जगताप यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्यातील आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाजगौरव पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. भानुदास बर्गे(निवृत्त सहायक पोलिस आयुक्त,पुणे), डॉ. एन. डी.देशमुख(पुणे जिल्हा सहसंचालक) यांच्या कडून श्री हेमंत बबन जगताप यांचा समाजगौरव पुरस्कार आणि समनापत्र देऊन सत्कार करण्यात आला या वेळी त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गरीब लोकांना योग्य मार्गदर्शन आणि योजनेत बसवून त्याचे लाखो रुपयांची बचत करून दिली , तसेच अनेक विद्यार्थ्यांना कमवा शिका अंतर्गत खेड्या पाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नौकरी उपलब्ध करून दिल्या आणि कोरोना काळात हजारो गरजू रुग्णांना मोफत जेवण आणि त्यांची व्यवस्था केली अश्या सर्व समाजसेवेसाठी या गौरव करण्यात आला. त्यांचे हेच कार्य त्यांनी बारामतीत सुरू करून अनेक काम मार्गी लावली आहेत आणि त्यासाठी बारामतीतील जवळ पास १००० समाजसेवक एकत्र केले आहेत आणि मराठा सहकार्य समूह या नावाने नोकरी व उद्योग करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचे मोफत मार्गदर्शन करतात.