आदित्य इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

बारामती (फलटण टुडे ): येथील आदित्य इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये 72 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी  बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष हनुमंत निबाळकर,निवृत्त सुभेदार लालासो बालगुडे,निवृत्त लेफ्टनंट बापूसाहेब भापकर, निवृत्त शिपाई बापूराव चव्हाण,लडाख येथे कार्यरत असणारे हवालदार नंदकुमार जगदाळे आदी भारतीय आर्मी मधील मान्यवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस आय सोशल मीडिया चे पुणे जिल्हा प्रमुख ऍड  रवींद्र रणसिंग
वंजारवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच किरणताई जगताप,उपसरपंच बबनराव सावंत, माजी सरपंच रोहितदास चौधर,अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड,दत्ता माने,संतोष माने,सचिन घाडगे,अरुण खेडेकर,सतीश किर्दक,प्रवीण मोरे,तुळशीदास शिरसट,सरस चे देवकर ,मालुसरे,रांधवन व सामाजिक कार्यकर्ते सरदार साळुंके,सौ वसुंधरा साळुंके आदी मान्यवर पालक,विद्यार्थी उपस्तीत होते.
देश सेवा केवळ बॉर्डरवर देशाचे रक्षण करून होत नसते तर सार्वजनिक मालमत्ता चे नुकसान करू नका,आपला परिसर स्वच्छ ठेवा,एतेहसिक वारसा चे जतन करा,भ्रष्ट्राचार करू नका,सर्व जाती धर्मा मध्ये सलोखा बंधुभाव जपा,माजी सैनिक,स्वातंत्र्य सैनिक व आई वडील  यांचा आदर करा आदी मंध्यमातून देश सेवा करत जावा असा सल्ला सर्व आजी माजी सैनिक मान्यवर यांनी दिला.
पती किंवा वडील बॉर्डरवर असताना प्रत्येक क्षण फार महत्वाचा असतो परंतु समाज्या मध्ये ताठ मानेने आम्ही सांगत असतो की मी बोर्डवर लढणाऱ्या शूर जवानांची पत्नी किंवा मुलगी आहे त्यामुळे अशा वीर जवानांचा अभिमान वाटतो असे उद्गार शूर पत्नी सौ जगदाळे व शूर मुलगी भाग्यश्री बालगुडे यांनी सांगितले.
देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक फी मध्ये 50% सवलत देणार असल्याचे माहिती आदित्य शैक्षणिक समूहाचे सस्थापक अध्यक्ष प्रा.सुजित वाबळे यांनी सांगितले.
या वेळी वक्तृत्व स्पर्धे मध्ये प्रथम आलेली कु. सानिया फिरोज मुजावर व   दहावी,अकरावी व नीट स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच माजी सैनिक यांच्या शूर पत्नी शूर कन्येचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन श्री अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार मुख्यध्यापिका सौ रुपाली आव्हाड यांनी आभार प्रदर्शन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!