फलटण : 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना शाश्वत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा. तहसीलदार फलटण यांचेमार्फत फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समिती व जुनी पेन्शन योजना हक्क संघटना यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.दि. १२ जानेवारी पूज्य भा. वा. शिंपी गुरुजी स्मृतीदिन अर्थात पेन्शन हक्क दिन…
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले भा.वा. शिंपी गुरुजी केवळ *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* चे संस्थापकच नाही; तर शिक्षक समितीच्या माध्यमातून ५४ दिवसाच्या संपात सहभागी होत शिक्षकांना पेन्शन लागू करण्यासाठीच्या लढ्यातील अग्रणी होते.
आज ज्या बांधवांना शासनाने पेन्शन नाकारली आहे त्यांना मुळची पेन्शन लागू होण्यासाठीच्या लढ्यात *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* चा सहभाग हे संघटनात्मक कर्तव्य आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा सातत्याने पेन्शन हक्क लढ्यात सामील राहिला आहे आणि जोपर्यंत शासन या संबंधाने सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत ह्या लढ्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सहभागी होणार असून या लढ्याची जाणीव सदोदित राहण्यासाठी *पूज्य शिंपी गुरुजींचा स्मृतीदिन (१२ जानेवारी) पेन्शन हक्क दिन म्हणून पाळणार आहोत.
सध्याच्या कोरोना संकटकाळी अनेक निर्बंध आहे. त्यामुळे यावर्षी मंगळवारी (ता.१२ जानेवारी २०२१) रोजी १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाश्र्वती अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासाठी शांततेत निवेदन दिलेले आहे.
परंतु शासनाने जर 31 मार्च 2021 अखेर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनेतीव्र आंदोलन केली जातील असे मत फलटण तालुका शिक्षक समितीचे नेते श्री. धन्यकुमार तारळकर यांनी व्यक्त केले. यावेळेस त्यांच्याबरोबर उपस्थित श्री. भगवंतराव कदम, श्री.सोमनाथ लोखंडे, श्री तानाजी सस्ते, श्री.राजेंद्र पवार, श्री.दत्ता जानकर, श्री. प्रवीण मोरे, श्री यशवंत जगताप,श्री गजानन पवार, श्री परमेश्वर कांबळे, श्री सुरज बेंद्रे, श्री जाधव सर,श्री.तानाजी वाघमोडे, श्री.निलेश कर्वे इत्यादी उपस्थित होते