सातारा दि. 22 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (म.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातारा येथील कार्यालयातून घेऊन सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले आहे.
मातंग व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील.