सातारा दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “विकेल ते पिकेल” या संकल्पनेवर आधारीत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे “ शेतकरी ते थेट ग्राहक आठवडी बाजार ” चा शुभारंभ मंगळवार दि. 26 जानेवारी रोजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आण्णासाहेब कल्याणी शाळे समोर, गोडोली येथे सकाळी 10.15 वाजता होणार आहे.
या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य इ. थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दर रविवारी सकाळी 8 ते 11 वा. या वेळेत हा बाजार भरेल. तरी ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.