अनिल सावळेपाटील यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (छाया राज फोटो रुई)
बारामती (फलटण टुडे प्रतिनिधी) :
गेल्या 15 वर्षा पासून बारामती च्या पंचक्रोशी मध्ये सूत्रसंचालक, व्याख्यता आणि पत्रकार म्हणून बारामती शहर व तालुक्याची भीमथडी ते बारामती असा प्रवास सांगून ऐतिहासिक, पोरमाणिक,राजकीय आदी सर्व माहिती सांगून कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढवून पत्रकारिते च्या माध्यमातून सकारत्मक बातम्या करून विकास कामे दाखवली आहेत प्रसंगी त्यामधील उणिवा दाखवण्याचे उल्लेखनीय काम पत्रकारिते च्या माध्यमातून सावळेपाटील यांनी दाखविल्याने ती कामे पुन्हा व्यवस्थित झाली आहेत असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले . पत्रकार व सूत्रसंचालक, व्याख्यता अनिल सावळेपाटील यांचा सत्कार रुई येथे करण्यात आला.
बारामती नगरपरिषद हद्दीतील
रुई येथील प्रभाग नं 4 च्या स्थानिक नगरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर यांच्या विकास कामाचा आढावा यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी अजित पवार बोलत होते या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर ,दूध संघाचे सभापती संदीप जगताप,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष
संभाजी होळकर,प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे,मुख्यधिकारी किरणराज यादव,भूमी अभिलेख चे उपअधीक्षक गणेश कराड व शहर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौधर ,गोरख चौधर,विशाल जगताप,नितीन पानसरे,विजय खाडे, आबा खाडे, नवनाथ चौधर,राहुल चौधर,नवनाथ आटोळे,संजय घाटे,अभि घाडगे,विकी कांबळे,रोहित काळे,मचिंद्र चौधर,अजिनाथ चौधर,विठ्ठल चौधर,मधुकर शिरसट, शिवाजीराव भोसले,सत्यवान घाडगे,प्रमोद कांबळे,सुनील चौधर,यशवंत चौधर,किरण चौधर,अमर घाडगे,रामभाऊ चौधर,साईनाथ चौधर
व नगरपरिषद चे सर्व नगरसेवक व रुई मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
कोणत्याही कार्यक्रम मध्ये सर्वसामान्य ते उच्च पदा पर्यंत असेलेल्या सर्व उपस्तीत यांचे नाव व पद घेऊन त्यांचे स्वागत करणे व कार्यक्रमाची उंची वाढविणे हे काम सावळेपाटील उत्तम व प्रभावी पणे करतात असेही अजित पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग चौधर यांनी केले.