नगरसेविका सुरेखा चौधर यांच्या विकास कामाचे पुस्तक प्रकाशन
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ):
बारामती चा विकास होत असताना रुई मधील जमिनींना जास्त भाव येत आहे त्यामुळे पुढील पिढीची तरतूद म्हणून जमिनी विकू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुई येथील प्रभाग नं 4 च्या स्थानिक नगरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर यांच्या विकास कामाचा आढावा यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी रुई मधील नागरिकाना सल्ला दिला.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव,नगरसेवक किरण गुजर ,दूध संघाचे सभापती संदीप जगताप,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष
संभाजी होळकर,प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे,मुख्यधिकारी किरणराज यादव,भूमी अभिलेख चे उपअधीक्षक गणेश कराड व शहर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौधर ,गोरख चौधर,विशाल जगताप,नितीन पानसरे,विजय खाडे, आबा खाडे, नवनाथ चौधर,राहुल चौधर,नवनाथ आटोळे,संजय घाटे,अभि घाडगे,विकी कांबळे,रोहित काळे,मचिंद्र चौधर,अजिनाथ चौधर,विठ्ठल चौधर,मधुकर शिरसट, शिवाजीराव भोसले,सत्यवान घाडगे,प्रमोद कांबळे,सुनील चौधर,यशवंत चौधर,किरण चौधर,अमर घाडगे,रामभाऊ चौधर,साईनाथ चौधर
व नगरपरिषद चे सर्व नगरसेवक व रुई मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
बारामती नगरपरिषद च्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून नगरसेविका सुरेखा चौधर यांनी रस्ता,वीज,पाणी,आरोग्य,स्मशानभूमी आदी प्रश्न मार्गी लावले आहेत हे कौतुकास्पद आसून राज्याचा अर्थमंत्री असल्याने बारामती च्या विकासासाठी जास्ती जास्त विकास निधी देऊ असेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित दादा च्या नेतृत्वाखाली विकास कामे करीत असताना या नंतर सुद्धा मोठ्या उमेदीने प्रस्तावित कामे पूर्ण करू व पुढील वीस वर्षाची लोकसंख्या चा विचार करून रुई मधील विकास कामे होत असल्याचे नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सांगितले.या वेळी पांडुरंग चौधर यांनी उपस्तीतचे स्वागत व आभार मानले तर सूत्रसंचालन आनिल सावळेपाटील यांनी केले.