बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
राजमाता जिजाऊ आदर्श पालक पूरस्कार श्रीमती. सुमन वायकर बारामती सायकल क्लब चे सस्थापक श्रीनिवास वायकर यांच्या मातोश्री ना पुरस्कार यांना बालगंधर्व पुणे येथे ( मंगळवार दिनांक 12/1/2021 ) प्रदान करण्यात आला.
राजमाता जिजाऊ जयंतीनिम्मित सदर पुरस्कार देण्यात आला संघर्ष मय परिस्थिती व बेताची आर्थिक परिस्थिती असताना मुलांना उत्कृष्ट संस्कार देऊन , शिक्षण देऊन स्वबळावर त्यांना उभे करून समाज्या मध्ये आदर्श निर्माण केल्याबद्दल सदर पुरस्कार देण्यात येतो.
सातारचे खासदार श्री. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जिजाऊ घराण्याचे वारस विक्रमसिंह जाधवराव, अभिनेत्री प्रिया बेर्डे , मा. आमदार निलेश अण्णा टिळेकर, डॉ. रजनीताई इंदुलकर , सौ निलाताई सासणे, असे मान्यवर उपस्थित होते..