मैत्री ग्रुप च्या वतीने मिशन होस्टेल मध्ये सामाजिक उपक्रम

मिशन होस्टेल मधील विद्यार्थ्यां समवेत मैत्री ग्रुप चे सदस्य
बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ): 
मा.शरद पवार यांचा वाढदिवस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैत्री ग्रुप च्या वतीने रविवार 17 जानेवारी रोजी  मिशन बॉईज होस्टेल येथे प्रभू येशू यांची  सामूहिक प्रार्थना व विद्यार्थ्यांना भोजन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी पुणे जिल्हा माजी शिवसेना प्रमुख सुनील शिंदे,शहर राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष छगन आटोळे, माजी पंचयात समिती सदस्य शाहजी गावडे ,
चंद्रवन मुंबईकर,ऍड मकरंद देवळे,
शहाजी खोमने,दिलीप जगताप,दिलीप शिंदे,अनिल जामदार,राजू झगडे,सचिन पहाडे,सुनील सातव,अशोक बेलकुटे,राजू कोंडे,पोपटराव काळे,निलेश गादीया,सुधीर जाधव  आदी मान्यवर उपस्तीत होते.
शरद पवार व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मैत्री चे किस्से सांगून   महाविकास आघाडी ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सदर कार्यक्रम प्रथमच बारामतीत घेत असल्याचे  पुणे जिल्हा माजी शिवसेना प्रमुख  सुनील  शिंदे यांनी सांगितले. चर्च ऑफ कॉन्फरन्स मिशन बॉईज संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्वागत केले तर सचिव रॉबर्ट गायकवाड यांनी आभार मानले 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!