जळोची ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
फाऊंडेशन मार्फत वेध भविष्याचा … दिशा अभ्यासाची इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन उद्माई विद्यालय घोलपवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी १० वी चे वर्ष म्हणजे भविष्यात जीवनाला कलाटणी देणारे वर्ष याच वयात त्यांच्या मनात ध्येयाची पेरणी झाली पाहिजे म्हणून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्याची गरज आहे असे मत विद्यानंद फाऊंडेशनचे चेअरमन आनंद लोखंडे सर यांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक विजयसिंह घाडगे उपस्थीत होते. त्यांनी अभ्यास कसा करावा ? ध्येय निश्चिती कशी करावी? अभ्यासातील अडचणी ? १० वी नंतर काय करावे यावर मार्गदर्शन केले गेले . यानंतर विद्यार्थ्यांना शब्दधन पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्माई विद्यालयाचे प्राचार्य. माने एस. एन सर आणि शाळेचे शिक्षक तसेच विद्यानंद परिवाराच्या सदस्या शिवानी सपकाळ उपस्थित होत्या.