बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
पोलीस भरती होण्या पूर्वी व भरती झाल्यानंतर येणारी आव्हाने व अपेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे पालकांनी अवाजवी अपेक्षा न धरता विद्यार्थ्यांचा कल पाहून पोलीस क्षेत्रात विचारपूर्वक पाल्यास पाठवा असा सल्ला उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पालकांना दिला आहे.
जय हो पोलीस प्रशिक्षण अकॅडमी च्या वतीने वर्धापन दिना निमित्त पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कु सावित्रा कदम व
सौ वनिता पिसे यांचा सत्कार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर मार्गदर्शन करीत होते.
या वेळी नगरसेवक राजेंद्र बनकर, राष्ट्रवादी युवक राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ,माजी सेल टॅक्स ऑफिसर प्रशांत सातव,ऍड सुहास क्षीरसागर,शिवाजी जाधव, पोलीस हवालदार शरद गावडे,आदी उपस्तीत होते.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर जय हो पोलीस प्रशिक्षण अकॅडमी ने आतापर्यंत 554 हुन अधिक पोलीस व 14हुन अधिक पीएसआय घडविले असल्याचे अकॅडमी चे संचालक संदीप जाधव यांनी सांगितले.
जय हो अकॅडमी ने शारीरिक व बौद्धिक अभ्यास व वेळ याचा समनव्य केल्यामुळे मैदानी खेळा मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कु सावित्रा कदम यांनी सांगितले तर वयाच्या 32 व्या वर्षी दोन अपत्ये असताना सुद्धा जय हो अकॅडमी ने करून घेतलेला सराव व अभ्यास यामुळे यश मिळाले आणि अकॅडमी च्या शिस्ती मुळे गोर गरिबांच्या मुलांचे खाकी वर्दी चे स्वप्न पूर्ण होऊ शकत असल्याबद्दल सौ वनिता पिसे यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस होण्यासाठी शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी जय हो कटिबद्ध आहे परंतु प्रशिक्षणार्थी यांनी वेळेचे व पालकांचे कष्ट यांचे भान राखून पोलीस होण्यासाठी परिश्रम घ्यावे
असे संचालक संदीप जाधव यांनी सांगितले.
या प्रसंगी यशस्वी प्रशिक्षणार्थी यांच्या पालकांचा फोटो ग्राफर प्रशांत कुचेकर यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.